परभणी,(प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील माजलगाव या ठिकाणी सोनार समाजातील पाच वर्षाच्या अल्पवयीन मूलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील नराधमाविरुध्द प्रशासनाने पोस्को कायद्यांतर्गत खटला दाखल करीत फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज संस्थानच्या पदाधिकार्यांसह सोनार समाजाच्या संतप्त नागरीकांनी केली.
ही घटना माणुसकीस काळीमा फासणारी आहे. यातील आरोपी राहुल वायखिंडे याचेही दुष्कृत्य निश्चितच गंभीर आहे. त्यामुळे त्या आरोपीस कुठलीही दया-मया न दाखविता पोस्को कायद्यांतर्गत खटला दाखल करीत फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी संतप्त नागरीकांनी केली. न्यायालयात खटला चालू असेपर्यंत संबंधित आरोपीस जामीन मिळता कामा नये, या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी व खटला फास्ट्रॅक न्यायालयात चालवावा, अशी अपेक्षाही संतप्त पदाधिकार्यांनी केली. या निवेदनावर दिनेश डहाळे, अमोल कुलथे, विठ्ठल शहाणे, दिपक टाक, विजय शहाणे यांच्यासह अन्य पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.. यावेळी आमदार डॉ राहुल पाटील, डॉ विवेक नावंदर यांनी पदाधिकारी यांची भेट याप्रकरणी लक्ष घालण्याच्या आश्वासन दिले. सदरील निवेदने सोनार समाज,देवांग कोष्टी समाज,ग्रामीण लाड सोनार संघटना महाराष्ट्र,सेवा नरहरीची संघटन ,कोष्टी समाज सेवा मंडळ संत नरहरी महाराज सेवाभावी संस्था आदी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले.
गोविंदराव आंबिलवादे संतोष शहाणे नाना मेड अक्षय इंगळे अमोल कुलथे बालाजी उकंडे अमोल शहाणे दत्तराव डहाळे पंकज अंबिलवादे ओंकार शहाणे सुभाष टाक ऋषिकेश शहाणे आदी निवेदन देताना दिसत आहेत. ( छाया- उत्तम बोरसूरीकर)



