
पालम (प्रतिनिधी ) – दि.07 रोजी कृषी आयुक्तालय पुणे येथे पीक विम्याचे प्रणेते डॉ सुभाषराव कदम,व शिवाजीराव दिवटे ता आ. पालम यांनी तत्कालीन कृषी संचालक माननीय श्री विनय औटी यांची भेट घेतली.
खरीप पीक विमा 2021 ची रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी औटी साहेबांचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले.
उतरदायीत्व म्हणून आयुक्त कार्यालय पुणे येथे त्यांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले. तसेच रब्बी पीक विमा (हरभरा) क्लेम 2023 चा पाठपुराव्या बाबत चर्चा केली.
चर्चे दरम्यान औटी यांनी बोलताना म्हणाले की
हरभरा पीक विमा 2023 सुद्धा 8-10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असे आश्वासन दिले


