परभणी,(प्रतिनिधी) : महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा शाखा परभणीच्या वतीने शुरवीर जिवाजी महाले यांची जयंती निमित्ताने शहरातून प्रतिमेची मोठी मिरवणूक काढण्यात आली.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक व प्रताप गडावरील रणसंग्रामात छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्राण वाचविणारे शुरविर जिवाजी महाले याची 389 वी जयंती दि. 9 ऑक्टोबर रोजी नाभिक महामंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
मिरवणुकीचे उद्घाटन आमदार डॉ. राहुल पाटील यांच्याहस्ते व उपमहापौर भगवान वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रविंद्र पतंगे, पाडुरंग भंवर, नानासाहेब राऊत, सुनिल देशमुख, स्वराजसिंह परिहार, सुशिलभैय्या देशमुख, किर्तीकुमार बुरांडे, पंजाबराव देशमुख, विनोद कदम, कृष्णा कठाळे, बालासाहेब पारवे, गणेश वाघमारे, रामभाऊ भवर आदींची उपस्थिती होती.
मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व जिवाजी महाले याचे तैलचित्र, बँड पथक, हालकी वादक, मावळ्यांच्या वेशाभूषातील मावळे तसेच सजीव देखाव्या मध्ये अश्वस्वार सहभागी होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष संपतराव सवने, आत्माराम राऊत, श्याम साखरे, आत्माराम प्रधान, संतोष जाधव, विष्णु वाघमारे, प्रकाश कंठाळे, दगडु राऊत, अकुश पितांबरे, वसंत पारवे, गोविंद भालेराव, बालाजी कंठाळे, संतोष वाघमारे, सुनिल भालेराव, वैजनाथ राऊत, निवृत्ती राऊत, भागवत भालेराव, रामा सुर्यवंशी, पांडुरंग भंवर पुंगळेकर, विष्णु गोरे, दत्ता गुंगे, भागवत भालेराव, विष्णु सुर्यवंशी, गणेश भुसारे, योगेश पितांबरे, भारत ढोबळे, कृष्णा प्रधान, श्रीपाद भवर, लक्ष्मण सम्मेटा, हरिभाऊ काठाळ, माणिक भालेराव आदींनी परिश्रम घेतले.