गंगाखेड,प्रतिनिधी) : प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी शहरातील गोदावरी नदीच्या काळावर शनिवारी (दि.12) सायंकाळी श्री साईसेवा प्रतिष्ठानच्या वतीने दसरा महोत्सवांतर्गत 51 फुटी अपप्रवृत्ती पुतळा दहन कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव करून सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी मंचावर आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, बाजार समितीचे माजी सभापती बाळकाका चौधरी, विद्यमान सभापती साहेबराव भोसले, मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मुरकुटे, रासपा जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप अळनुरे, उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, डॉ. सौ. गीतांजली दिलीप टिपरसे, सौ. सुलभा दिपककुमार वाघमारे, श्रीमती मंगला श्रीनिवास कुलकर्णी, सौ. सुर्यमाला मोतीपवळे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दगडूसेठ सोमाणी, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अॅड. संतोष मुंडे, हाजी गफार शेख, मित्र मंडळ तालुकाध्यक्ष रामप्रसाद सातपुते, काँग्रेस शहराध्यक्ष शेख युनूस, संजय गांधी निराधार सदस्य प्रा. पिराजी कांबळे, माजी उपनगराध्यक्ष राधाकीशन शिंदे, माजी नगरसेवक सत्यपाल साळवे, अॅड. कलीम, राजू पटेल, राजेश दायमा, बाबा पोले, पत्रकार प्रमोद साळवे, रमेश कातकडे, गोपी मुंडे, सखाराम बोबडे, बालासाहेब पारवे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा संयोजक गोविंद यादव आदिंची उपस्थिती होती.
याप्रसंगी आ. गुट्टे व इतर मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणवंत कल्पेश कुलकर्णी, श्री व सौ. अॅड. स्मिता राजू देशमुख, कृष्णा व गोपाळ सुर्यवंशी, युवराज फड, अक्षय सोडगीर, मोहन चोरघडे, वेदांत ढाकणे, सय्यद आयेशा, निशिगंधा मस्के, गंगाराम मसनजोगी आदिंचा गौरव करण्यात आला. प्रिभूषन नृत्य अकादमीच्या सौ.प्रियंका भूषण गाडे व संच, स्टार डान्स अकादमीचे राधे आव्हाड आणि त्यांचे सहकारी यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक सादरीकरणाने उपस्थितांची वाहवा मिळवली. शिवाजीनगर तांडा येथील जि.प.प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक बंजारा पेहरावात सादर केलेल्या व्यसनमुक्तीवरील कलाकृतीस प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यांनंतर झालेली नेत्रदीपक आतिषबाजी आणि 51 फुटी पुतळ्याचे दहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविंद यादव यांनी केले. सुत्रसंचालन पदुदेव जोशी, भगत सुरवसे यांनी तर आभार प्रदर्शन मनोज नाव्हेकर यांनी केले.
Friday, July 18
ताज्या बातम्या:
- कृषि पंप योजनेवरुन सरकारला धरले धारेवर ; आ.डॉ.राहुल पाटील विधानसभेत आक्रमक-लक्षवेधीद्वारे वीज समस्यांकडे वेधले सरकारचे लक्ष
- संबर येथील अपहरण आणि खून प्रकरणातील पाच आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हा शाखा व परभणी ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई
- उद्यापासूनच जिल्ह्यातील कॅनॉल व माजलगाव धरणात पाणी सुटणार; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची बैठकीत माहिती
- पालकाच्या मृत्यूप्रकरणात निवेदन सादर करा; आ.डॉ राहुल पाटील यांच्या प्रश्नावर विधानसभा अध्यक्षांच्या सूचना
- भाजपा जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांचा मदतीचा हात; ह.भ.प. जगन्नाथ महाराज हेंडगे मृत्यू प्रकरणातील पीडित कुटुंबास दोन लाखांची आर्थिक मदत
- जायकवाडी डाव्या कालव्या मार्फत शेतीसाठी पाणी सोडावे युवक काँग्रेसची मागणी
- आ राजेश विटेकर यांनी विधान सभेत उपस्थित केलेल्या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन वर कार्यवाही
- “त्या” संस्थाचालकाचे बँक खाते फ्रिज करावे- सिद्धार्थ पानबुडे ; मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन