परभणी (प्रतिनिधी) जिल्हाधिकारी कार्यालय vव तहसील कार्यलय परभणी येथे आधार नोंदणी केंद्राची उद्घाटन आज रोजी माननीय जिल्हाधिकारी परभणी यांच्या हस्ते करण्यात आले सदरील आधार केंद्रामध्ये चार आधार नोंदणी संच स्थापन करण्यात आले असून येथे नागरिकांना आधार संदर्भात विविध सेवा देण्याचे काम करण्यात येणार आहे तरी सदरील आधार केंद्र मध्ये आधार नोंदणी व दुरुस्ती करिता नागरिकांनी लाभ घ्यावा असे माननीय जिल्हाधिकारी यांनी आवाहन करण्यात आले
तसेच सदरील केंद्रामध्ये 18 वर्षावरील नागरिकाची आधार नोंदणीचे सुद्धा केंद्र चालू करण्यात आलेले आहेत आधार केंद्रांमध्ये लहान मुलांचे आधार कार्ड काढणे आधार मध्ये नाव, पत्ता, मोबाईल नंबर, जन्म तारीख दुरुस्त करणे बायोमेट्रिक अपडेट करणे फोटो बदलणे इत्यादी सेवा नागरिकांना देण्यात येणार आहेत. सदरील कार्यक्रम प्रसंगी माननीय श्री.रघुनाथजी गावडे जिल्हाधिकारी परभणी, श्री. प्रताप काळे अप्पर जिल्हाधिकारी परभणी , श्रीमती अनुराधा ढालकरी निवासी उपजिल्हाधिकारी परभणी, श्री. दत्तू शेवाळे उपविभागीय अधिकारी परभणी, श्री. संदीप राजापुरे तहसीलदार परभणी, श्री. गणेश चव्हाण तहसीलदार परभणी, तसेच श्रीमती संध्या जाधव, श्री विश्वनाथ कणके, नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी परभणी व श्री . अण्णासाहेब वाघमारे ,श्री.अतुल नेहाते, श्री. नरेंद्र आडगावकर , माहिती तंत्रज्ञान कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय परभणी तसेच या केंद्राचे केंद्र चालक सचिन शेटे, अंगत सावंत ,नवनाथ लिंगायत बालाप्रसाद डागा हे उपस्थित होते याप्रसंगी केंद्र चालकांनी नागरिकांना नियमाप्रमाणेच शासकीय दरानुसारच सेवा देण्याचे माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आश्वासित करून आम्ही नागरिकांना देऊ असे