परभणी ( प्रतिनिधी) पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालयात “संशोधनातील सांख्यिकीय साधने आणि डेटा विश्लेषण” या विषयावर (१४ ते १९ ओक्टोम्बर ) सहा दिवसीय आभाषि ( ऑनलाईन ) राष्ट्रीय प्रशिक्षणास प्रारंभ झाला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नितीन कुरकुरे, संशोधन संचालक, महाराष्ट्र पशु व मस्त्य विज्ञान विद्यापीठ नागपूर, आणि डॉ. अब्दुल समद माजी संचालक शिक्षण व अधिष्ठाता, महाराष्ट्र पशु व मस्त्य विज्ञान विद्यापीठ नागपूर हे होते तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुधीर राजूरकर होते. प्रारंभी प्राणी आनुवंशिकता आणि प्रजनन विभाग प्रमुख डॉ. बी.एस. कातकडे यांनी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षणांबद्दल माहिती देऊन सदरील प्रशिक्षण आयोजन मागील भूमिका विशद केली. या प्रशिक्षणाचे संयोजक डॉ. साजिद अली , सहाय्यक प्राध्यापक , प्राणी आनुवंशिकता आणि प्रजनन विभाग यांनी या साहा दिवसीय राष्ट्रीय प्रशिक्षणाच्या आयोजनामागची भूमिका विशद केली व या आभाषि ( ऑनलाईन ) सहा दिवसीय राष्ट्रीय प्रशिक्षणास देशातील ४०० हुन अधिक सहभागिर्तीनी नोंदणी करून सह्भागी झाले असल्याचे सागितले.
संशोधनामध्ये सांख्यिकीशास्त्राला अनन्य साधारण महत्व आहे. ” संशोधनातील सांख्यिकीय साधने आणि डेटा विश्लेषण ” या विषयावर आभाषि ( ऑनलाईन ) पद्धतीने आयोजित केलेले प्रशिक्षण संशोधक, विद्यार्थी यांना त्यांच्या संशोधनाकरिता उपयुक्त असून सदरील प्रशिक्षण आयोजित केल्याबद्दल डॉ. नितीन कुरकुरे, संशोधन संचालक, महाराष्ट्र पशु व मस्त्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांनी संयोजकांचे अभिनंदन केले. तर संशोधनातील सांख्यिकीय साधने आणि डेटा विश्लेषण याकरिता आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करावा व त्या विषयावर भविष्यात प्रशिक्षण आयोजित करावे अशी अपेक्षा डॉ. अब्दुल समद माजी संचालक शिक्षण व अधिष्ठाता, महाराष्ट्र पशु व मस्त्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांनी व्यक्त केली.
या राष्ट्रीय प्रशिक्षणात देशातील नामांकीत संशोधन संस्था व विद्यापीठातील संशोधक व प्राध्यापक डॉ. अब्दुल समद , डॉ. एस. एस. तोमर, डॉ. विकास व्होरा, डॉ. रवी कुमार ,डॉ. अनिल गोरे, डॉ. ए. पी. रुहील , डॉ. एस. पी. गीते, डॉ. मिलिंद वैद्य, डॉ. डॉ. एस. पी. गीते , डॉ. जी. आर. गोवणे , डॉ. प्रतीक्षा कदम, डॉ. मिर्झा बेग,डॉ. तेजस शेंडे हे ” संशोधनातील सांख्यिकीय साधने आणि डेटा विश्लेषण ” या महत्वाच्या विषयावर प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षणास आलेम्बिक फार्मा कंपनीचे डॉ. करुणानिधी आणि डॉ. संतोष शिंदे यांनी ऑनलाईन च्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुधीर राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षणाचे मुख्य संयोजक डॉ. साजिद अली , डॉ. बी.एस. कातकडे, डॉ. पंडित नांदेडकर, डॉ. महेश चोपडे,डॉ. एम. एफ. एम. एफ. सिद्दीकी , डॉ. सुमित वानखडे, डॉ. एम. बी.ए. सिद्दीकी डॉ. पी.एम. केकाण, डॉ. कल्याण टेकाळे, डॉ. पी. एस. बनकर, डॉ. क्रांती खारकर, डॉ. व्हि.डी. पवार , डॉ. ए. वाय. डोईफोडे , डॉ. प्राजक्ता जाधव. तसेच महाविद्यालयतील प्राध्यापक व विद्यर्थी परीश्रम घेत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.सुमित वानखडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. पंडित नांदेडकर यांनी केले