पलाभणी (प्रतिनिधी) शहरातील बाल विद्यामंदिर हायस्कूल , नानलपेठ येथे भारताचे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्ताने वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाचे आयोजन वर्ग १० वा ड च्या वतीने करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण बोराडे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रशालेचे शिक्षक सुभाष ढगे होते. यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक बळीराम कोपरटकर , सीमा बोके यांची उपस्थिती होती. भारतरत्न डाॕ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे व ग्रंथ पुजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनीडाॕ. ए. पी .जे .अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे केली . या प्रसंगी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भितीपत्रकांचे विमोचन अतिथींच्या हस्ते करण्यात आले. वर्ग १० ड च्या विद्यार्थ्यांनी याप्रसंगी प्रशालेच्या ग्रंथालयास संविधान ग्रंथ भेट दिला.
प्रमुख मार्गदर्शक सुभाष ढगे यांनी *पुस्तक म्हणजे आपला मित्र आहे व आपला मित्र म्हणजे ग्रंथालय आहे. असे सांगत अंतर्मन शुध्दीकरण करण्यासाठी आपण नित्यनियमित वाचन केले पाहिजे. तसेच जीवनातील आपले ध्येय गाठण्यासाठी वाचन महत्वपूर्ण भूमिका बजावत असते. तसेच वयोवृध्द व्यक्तींना आपल्या वेळेचं उपयोजन करण्यासाठी पुस्तके व वाचन हे खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात यामुळे त्यांना विरंगुळा मिळून त्यांचे आयुष्य वृद्धिंगत होत असते.* असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय समारोपात प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण बोराडे यांनी *वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. डाॕ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याचा परिचय देत वाचनाने व्यक्ती संपन्न बनतो व तो आपले स्थान उंचावर नेऊ शकतो हे गोष्टी रूपाने स्पष्ट केले.*
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनी कु. पूनम बोबडे व कु. ऐश्वर्या खंदारे यांनी केले. तर आभार कु. नेहा रायमले व शर्वरी पुरी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक नितीन गोराडकर यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमासाठी प्रशालेचे विध्यर्थी व सर्व शिक्षक वृंद यांची उपस्थिती होती.