परभणी (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालयाने रविवारी दुपारी महाराष्ट्रातील 99 मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केली.यात विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आ. सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांना पुन्हा एकदा जिंतूर मधून उमेदवारी जंजिरा करण्यात आली.
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव तथा मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्या पाठोपाठ विदर्भ, खानदेश, मराठवाडाच्या काही जिल्ह्यातील अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.
नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघातून श्रीजया अशोक चव्हाण, नायगाव मधून राजेश संभाजी पवार, मुखेडमधून तुषार राठोड यांना तर हिंगोलीतून विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे, परतुरमधून माजी मंत्री बबनराव लोणीकर,बदनापूर मधून नारायण कूचे, भोकरदन मधून संतोष रावसाहेब दानवे,फुलंब्री मधून श्रीमती अनुराधाताई अतुल चव्हाण, संभाजीनगर मधून अतुल सावे,गंगापूर मधून प्रशांत बंब यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


