परभणी,(प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या शासकीय सुट्ट्यांव्यतिरिक्त स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या अधिकारातील सुट्ट्या जाहीर करण्याच्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी वर्षातील तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या होत्या. त्यात 31 ऑक्टोंबर रोजी नरक चतुर्थीनिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. परंतु, त्यात बदल करीत आता 7 डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असल्यामुळे उद्या शासकीय व निमशासकीय कार्यालय सुरु राहणार आहेत.
दि. 26 डिसेंबर 2023 च्या अधिसुचनेनुसार 31 ऑक्टोबर, 2024 रोजीची दिपावलीची (नरक चतुर्दशी) सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्याऐवजी दि. 4 जानेवारी 2024 च्या सुधारित अधिसूचनेनुसार दि. 7 डिसेंबर 2024 रोजीची चंपाषष्टीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार दि. 31 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील शासनाची सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये नियमितपणे सुरु राहतील, असे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी कळविले आहे. हा आदेश जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालय, केंद्र शासनाची कार्यालये आणि बँकांना लागू होणार नाही, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


