परभणी (प्रतिनिधी) महायुतीचे तसेच शिवसेना पक्षाचे उमेदवार आनंद भरोसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा 9 नोव्हेंबर रोजी सावली विश्रामगृह समोर येथे 11 वाजून 45 मिनिटांनी आयोजित करण्यात आली आहे .
परभणी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांच्या प्रचारार्थ 9 नोव्हेंबर शनिवार रोजी सावली विश्रामगृह वसमत रोड समोरील मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी पोलीस मुख्यालय येथील परेड मैदानावर हेलीपॅड येथे त्यांचे आगमन होईल. त्यानंतर सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी ते सभा स्थळाकडे रवाना होतील. त्यानंतर 12 वाजून 30 मिनिटांनी ते पुन्हा हेलिकॉप्टर द्वारे नांदेड कडे प्रस्थान करतील. मुख्यमंत्री यांच्या सभेची पूर्ण तयारी झाली असून एकनाथ शिंदे नेमकं काय बोलतील याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



