परभणी, (प्रतिनिधी) 85 वर्षांवरील व्यक्ती व दिव्यांग मतदारांसाठी परभणी विधानसभा मतदारसंघात आजपासून गृहभेट मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. स्वत: जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी परभणी शहरातील प्रभावती नगर येथील रहिवासी कमलाकर कातनेश्वरकर (वय 93) व कुसुम कमलाकर कातनेश्वरकर (वय 87) यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी या दोघांनी मतदानाचा घरुनच हक्क बजावला.
मौजे धर्मापूरी येथील दिव्यांग मतदार माधव प्रभाकर कदम यांचेही मतदान जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत करुन घेण्यात आले. मतदान केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी या मतदारांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, टपाली मतदान कक्षप्रमुख गणेश चव्हाण, मंडळ अधिकारी विकास आगलावे व गृहभेट मतदान पथक हजर होते.
गृहभेट मतदानाकरीता परभणी विधानसभा मतदारसंघात सहा पथके स्थापन करण्यात आली आहेत. सदर मतदान पथके संबंधित मतदारांच्या घरोघरी जाऊन निवडणूक नियमांचे पालन करून त्यांचे मतदान करून घेत आहेत.
***


