परभणी (प्रतिनिधी) शुक्रवार दि 15 नोव्हेंबर रोजी येथील अन्नपूर्णा लॉन्स येथे खा श्रीकांत शिंदे यांची सभा महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आली होती. यावेळी परशुराम आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समितीच्या वतीने खा. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत महायुती चे उमेदवार आनंद भरोसे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला.
यावेळी संदर्भात बोलताना संयोजक स्वप्नील पिंगळकर म्हणाले की सकल ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी मागील अनेक वर्षापासून ब्राह्मण समाजाच्या हितासाठी स्वतंत्र परशुराम महामंडळ स्थापन करण्यात यावे यासाठी आत्तापर्यंत अनेक निवेदन, आंदोलन व शिष्टमंडळाद्वारे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक अशा अनेक प्रकारे परशुराम महामंडळ मिळवण्यासाठी संघर्ष समितीच्या वतीने प्रयत्न केले होते.
ब्राह्मण समाजाला स्वतंत्र परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे महायुती सरकारने दिले असून त्यासाठी समिती महायुतीचे उमेदवार आनंद शेषेराव भरोसे यांनी समाजासाठी शासन दरबारी वेळोवेळी यशस्वी पाठपुरावा केला व तसेच मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिष्टमंडळाद्वारे आमची भेटही घडून आणली.
ब्राह्मण समाजाच्या परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संघर्ष समितीच्या वतीने बिनशर्त जाहीर पाठिंबा देत असल्याचे सांगितले.
यावेळी महायुती तथा शिवसेनेचे उमेदवार आनंद भरोसे, प्रचार प्रमुख राजू कापसे, मोहन कुलकर्णी आदींसह परशुराम आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


