परभणी, (प्रतिनिधी) विधानसभा निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यासाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आज अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी टपाली मतदान सुविधेच्या माध्यमातून आपला मतदानाचा हक्क बजावला.
प्रत्येक मत हे अमूल्य आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी मतदान हे केलेच पाहिजे. मतदानाचा आपला अधिकार बजावणे आवश्यक आहे. मी मतदान केले आहे, आपणही मतदान करावे. बुधवार, दि. 20 नोव्हेंबर रोजी सर्व मतदार विशेषत: नवमतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे, असे आवाहन डॉ. काळे यांनी सर्व मतदारांना केले आहे.
परभणी येथील तहसिल कार्यालयातील टपाली मतदान सुविधा केंद्रात डॉ. काळे यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासमवेत निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे यांनीही टपाली मतदान केले.
(छाया- उत्तम बोरसुरीकर)
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


