सेलू (प्रतिनिधी) येथे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी रांगोळी उपक्रमातून सोमवार ( दि.१८ ) रोजी मतदार जनजागृती करण्यात आली. रांगोळी उपक्रमास शहरात शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
२० नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावंडे , जिल्हास्तरीय स्वीप नोडल अधिकारी गणेश शिंदे , सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी , तहसीलदार डॉ. शिवाजी मगर , गटशिक्षणाधिकरी उमेश राऊत यांच्या मार्गदर्शनात सेलू गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने मतदार जनजागृतीसाठी शहरातील नूतन विद्यालय, ज्ञानतीर्थ विद्यालय , यशवंत विद्यालय , न्यू हायस्कुल , के.बा. विद्यालय , नूतन इंग्लिश स्कुल , के.जी.बी.व्ही शाळा , विवेकानंद प्राथमिक विद्यालय , यासेर उर्दू शाळा आदी शाळांनी त्यांच्या परिसरातील मुख्य रोड अथवा चौकात भव्य अशी रांगोळी काढून मतदार जनजागृतीचा संदेश दिला. रांगोळी उपक्रम यशस्वीतेसाठी नोडल अधिकारी रमेश मरेवार , शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक यांनी उपस्थीत राहुन प्रयत्न केले.


