परभणी ( प्रतिनिधी) सोमवार दि 2 रोजी परभणी शहरातील खानापूर येथे सिमेंट रोड व नाली बांधकामाचे भूमिपूजन पाथरी मतदारसंघाचे नवनिर्वाचित आ. राजेश विटेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
जिल्हा नियोजन विकास निधी अंतर्गत हि विकासकामे परभणी शहराचे प्रथम महापौर प्रताप भैय्या देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत. त्यामुळे खानापूर परिसरातील नागरिकांना अंतर्गत दळणवळण करण्यासाठी चांगली सोय उपलब्ध होईल. बऱ्याच वर्षा नंतर खानापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून व माजी नगर सेवक राजू शिंदे यांच्या पुढाकारातून विकास निधी उपलब्ध झाला आहे. खानापूर मध्ये 4 कोटी रुपयांचा विकास कामाचा शुभारंभ या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे औचित्य साधून पाथरी विधानसभा विजयाबद्दल खानापूर वासीयांच्या वतीने आ.राजेश विटेकर यांचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. यावेळी प्रथम महापौर प्रताप भैया देशमुख, मा.नगर सेवक राजू शिंदे, शंकरराव भागवत, प्रा. रामेश्वर आवरगंड, सुरेश काळे, सुरेंद्र रोडगे, सुदाम तुपसुंदरे, संजय कदम, माऊली मोहिते, बलिरामजी मोहिते, बाळासाहेब शिंदे, माऊली काळे, बालाजी मोहिते, पांडुरंग शिंदे, गोपाळ शिंदे नंदू राऊत मारुती राऊत वशिष्ठ शिंदे आदी बहुसंख्य परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( छाया- उत्तम बोरसुरीकर)


