सेलूत गोशाळेच्या टिनशेड उभारणीच्या कामाचे भूमिपूजन
परभणी,(प्रतिनिधी) : येथील श्री संत गोविंदबाबा दादुपंथी मठ गोशाळेच्या 32 एक्कर जागेवर आकर्षक असे पर्यटन केंद्र उभारूण, गोशाळेच्या विकासासाठी आपण विशेष प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.
येथील दादूपंथी मठ गोशाळेत गोसेवा आयोगाच्या वतीने मंजुर करण्यात आलेल्या गोशाळेच्या टिनशेड उभारणीच्या कामाचे भूमीपूजन बुधवारी (दि.11) आमदार बोर्डीकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अॅड. दत्तराव कदम, डॉ. संजय रोडगे, माजी सभापती दिनकर वाघ, गोशाळेचे सदस्य सुरेंद्र तोष्णीवाल, जगन्नाथ पवार, अविनाश बिहाणी, सूर्यकांत जाधव, भाजपा महिला आघाडीच्या रूपालीताई ठाकूर, कपील फुलारी, अजय डासाळकर, कृष्णा काटे, अॅड. कृष्णा शेरे, अनुप गुप्ता, अशोक शेलार आदींची उपस्थिती होती.
यावेळी नवनिर्वाचीत आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते गोमातेच्या पुजन करण्यात आले. तसेच गोशाळेच्या वतीने आमदार बोर्डीकर यांचा निवडणूकीतील विजयाबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवनारायण मालाणी, गोपुजनाचे पौराहित्य मनोहर महाराज रत्नपारखी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंद सोनी, बबलू दायमा, पापा काबरा, गोविंद शेलार, विजय पांडे आदींनी परिश्रम घेतले.


