परभणी, (प्रतिनिधी) – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 90 व्या वर्षपूर्ती निमित्त लीड बँकेच्यावतीने स्नेह वृद्धाश्रमात गुरुवारी (दि. 2) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते वृध्दाश्रम परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी स्टेट बँक ऑफ इंडिया क्षेत्रीय व्यवस्थापक सम्राट पुरकायस्थ, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे प्रमुख जिल्हा अधिकारी राजेंद्र कनिशेट्टी, लीड बँक ऑफ इंडिया जिल्हयाचे मुख्य व्यवस्थापक उदय एस. कुलकर्णी, वृद्धाश्रमाच्या प्रभारी श्रीमती सुनीता अहिरे, आरसेटीचे संचालक जितेंदर सिंग कुशवाह आदी उपस्थित होते. आयोजकांच्यावतीने वृद्धाश्रमातील महिलांना दुपारचे भोजन देण्यात आले. कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल श्रीमती अहिरे यांनी आभार मानले.
*-*-*-*-*


