परभणी,(प्रतिनिधी) पाथरी रस्त्यावरील आर.पी.हॉस्पिटल येथे एक जानेवारी ते 15 जानेवारी या दरम्यान आ.डॉ.राहुल पाटील यांच्या पुढाकारातून मोफत हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे,या शिबिरात बारा दिवसात दहा हजार जणांची तपासणी केली.रुग्णांचा वाढता प्रतिसाद पाहून 31 जानेवारीपर्यंत हे शिबिर सुरू ठेवण्यात येणार आहे अशी माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी दिली
सध्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे विविध आजार बळावत आहेत, यामध्ये हृदयरोग आजाराचे प्रमाण वाढत आहे.तसेच मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे, या आजाराचे धोके ओळखून लवकर निदान व उपचार केल्यास संबंधित आजाराचे प्रमाण व मृत्यू रोखता येतो ही गरज ओळखून आ. डॉ.राहुल पाटील यांनी आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे दिनांक 1 जानेवारी ते 15 जानेवारी या दरम्यान मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे आतापर्यंत या शिबिरात दहा हजाराहून अधिक जणांनी आपली तपासणी पूर्ण केली आहे त्यामुळे तपासणीला वाढता प्रतिसाद पाहून हे शिबिर येत्या 31 जानेवारीपर्यंत सुरू ठेवली जाणार आहे अशी माहिती आमदार डॉ.राहुल पाटील व डॉ.प्रमोद शिंदे यांनी दिली आहे.
आर.पी.हॉस्पिटल येथे अनुभवी तज्ञ डॉक्टर व त्यांचे सहकारी हे अद्यावत सुविधा यांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत आहे,या शिबिरात तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन,ईसीजी, रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब तपासणी या सुविधा मोफत मिळत आहेत. दैनंदिन कामांमध्ये चक्कर येणे, थकवा येणे,हृदयाच्या विफलतेमुळे धडधडणे, छातीत दुखणे, अस्वस्थ होणे, हृदयाची ठोके अनियमित होणे यासारखी लक्षणे असलेले रुग्ण या शिबिराचा लाभ घेऊ शकतात. सर्वात अत्याधुनिक कॅथलॅब, 24 तास आयसीयू सेवा व एकाच छताखाली सर्व प्रकारचे उपचार व इतर सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शिबिरात नोंदणी झालेल्या पहिल्या शंभर नोंदणी केलेल्या रुग्णांच्या या शिबिरा अंतर्गत मोफत ऑंजीओग्राफी आणि अँजिओप्लास्टी महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आरपी हॉस्पिटल येथे करण्यात येणार आहे. तसेच इतर रग्णांचे उपचार अल्प दरात केले जाणार आहेत. गरजू आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या रुग्णांना मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर या शहरात जाऊन उपचार घेण्याचा मानसिक आणि आर्थिक ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे, त्यामुळे रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन आ.डॉ.राहुल पाटील,परभणी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ.प्रमोद शिंदे व वैद्यकीय अध्यक्ष डॉ.अमिर तडवी यांनी केले आहे.


