सेलू,(प्रतिनिधी) : सेलू येथील साई नाट्य मंदिरात 1 फेबु्रवारी रोजी होणार्या राज्यस्तरीय तालुका अध्यक्ष पत्रकार संघ मेळावा व आदर्श तालुका पुरस्कार वितरण सोहळ्यास सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे उपस्थित राहणार आहेत.
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे यांच्या नेतृत्वाखाली सेलू तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल, मो. इलियास, सचिव शेख मोहसीन, कांचन कोरडे, शेख राज आदींनी मंगळवारी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या संभाजी नगर येथील निवासस्थानी भेट घेऊन या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. यावेळी मंत्री संजय सिरसाट यांनी हे निमंत्रण स्विकारुन या मेळाव्यास आपण उपस्थित राहू, असे म्हटले.
दरम्यान, या मेळाव्यास प्रमुख उपस्थितीत राज्यमंत्री सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर, अध्यक्षस्थानी माजी आमदार हरिभाऊ लहाने, स्वागताध्यक्ष विनोद बोराडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सेलू तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल व सचिव शेख मोहसीन अहमद यांनी दिली.


