परभणी (प्रतिनिधी) दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरी होणाऱ्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गौतम नगर येथील सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निलेश गायकवाड यांची आज दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सर्वानुमते निवड करण्यात आली.
त्या निमित्ताने सर्व समाज बांधवांच्या वतीने परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात आले व अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निलेश गायकवाड यांचा भव्य सत्कार करण्यात आला. ही निवड गौतम नगर येथील विहारात बैठक घेऊन घेण्यात आली असून त्या वेळी बौद्ध समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ( छाया संजय घोणस8)