विविध शैक्षणिक मागण्यांसाठी अभाविपचे आंदोलन
परभणी ( प्रतिनिधी ) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, परभणी यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शैक्षणिक प्रश्नांसाठी येत्या २४ फेब्रुवारी रोजी “विद्यार्थी आक्रोश मोर्चा_ आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाभरातून विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.
अभाविपने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे की, राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश, परीक्षा, शिष्यवृत्ती, शुल्कवाढ, वसतिगृह, वाहतूक सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सरकार विद्यार्थ्यांच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याचे काम करत असल्यामुळे विद्यार्थी परिषदेच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक, आर्थिक व प्रशासकीय समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शासन व संबंधित प्रशासनाने या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे.
यावेळी प्रमुख मागण्यांमध्ये अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांचे शुल्क माफ करावे व सर्व स्पर्धा परीक्षांचे वाढीव शुल्क तात्काळ कमी करावे., मुलींच्या मोफत शिक्षण योजनेची अंमलबजावणी शासन परिपत्रकानुसार पूर्णपणे करावी., डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ मधील प्रवेश, परीक्षा व निकालासंदर्भातील समस्या तात्काळ सोडवाव्यात., महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांतील रिक्त प्राध्यापक पदे भरावीत व परीक्षा शुल्क कमी करावे., शिष्यवृत्ती योजना (डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना) तात्काळ विद्यार्थ्यांच्या खात्यात वर्ग कराव्यात., Interns व Resident Doctors यांचे स्टायपेंड वाढवावे., आयटीआय महाविद्यालयांमध्ये अद्ययावत उपकरणे व नवीन इमारती उभाराव्यात तसेच विद्यार्थ्यांचा भत्ता वेळेत जमा करावा., परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्वतंत्र इमारत तात्काळ पूर्ण करून सुरू करावी., वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील रिक्त पदे भरावीत., महाविद्यालयीन खुल्या विद्यार्थी निवडणुका महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार सुरू कराव्यात., MH-CET प्रवेश प्रक्रिया सुलभ, कालबद्ध व पारदर्शक करावी., अकरावी प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक सुधारणा करून वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे., मराठी माध्यमांच्या शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात., ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यावी., पशुवैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी अंतनिर्वाह भत्ता व अधिछात्रवृति सुरू करण्यात यावी., परभणी येथे शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू कराव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र परभणी मागील चार वर्षापासून भाडेतत्त्वाच्या जागेत सुरु झालेले उपकेंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी उपकेंद्रसाठी तात्काळ जागेची व इमारतीची उपलब्धता करून देण्यात यावी आधी प्रमुख मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे
हा मोर्चा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ गेट ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गाने निघणार आहे या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन परभणी शहर मंत्री कु सेजल काळे यांनी केले आहे.


