परभणी, (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत सईद खान शेरगुल खान हे विजयी झाले. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी निवडणूक निरीक्षक रूचेश जयवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरूणा संगेवार, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दि. 18 जून रोजी या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सात मतदान केंद्रावर 466 पैकी 465 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या मतांची मतमोजणी आज कडेकोट बंदोबस्तात तसेच शांततेत व सुरळीत पार पडली.
आज झालेल्या मतमोजणीनंतर सईद खान शेरगूल खान (पक्ष-शिवसेना) यांना 242 मते मिळाली, तर विवेक पांडुरंग नावंदर (पक्ष-शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांना 159 आणि सुशीलकुमार सुरेशराव देशमुख (अपक्ष) यांना 56 मते मिळाली. 8 मते बाद ठरली.
***
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


