परभणी, (प्रतिनिधी) : प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान व कार्यक्षम करण्यासोबतच निर्णय प्रक्रियेत गती आणून सर्वांच्या सहभागातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्याच्या उद्देशाने ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ जिल्ह्यातील सर्व स्तरांवर राबविण्यात येत आहे. या अभियानात जिल्ह्यातील सर्व विभागांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.
अभियानांतर्गत सेवांच्या गुणवत्तेत वाढ, लोकाभिमुखता, धोरणात्मक सेवांची प्रभावी अंमलबजावणी, ई-ऑफिसची अंमलबजावणी, ऑनलाईन पोर्टलवरील तक्रारींचा निपटारा, उपलब्ध संसाधनांचा पर्यायी वापर, तंटा व तक्रारमुक्त कार्यालय, नाविन्यपूर्ण व पथदर्शी संकल्पना, प्रयोग व उपक्रम तसेच ई-पंचनामा यामध्ये उत्कृष्ट काम करणारे कर्मचारी आदी बाबींचा स्पर्धेसाठी विचार करण्यात येणार आहे. वैयक्तिक स्तरावरील कर्मचाऱ्यांनाही या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असून त्यासाठी ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ हे स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलवरून संबंधित विभागांनी विहित कालावधीत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी केले आहे.
अभियानासाठी विचारात घेण्यात येणारा कालावधी 20 ऑगस्टपासून एक वर्षाचा राहणार आहे. तथापि, प्रशासकीय सुधारणांशी संबंधित प्रस्ताव व कल्पनांसाठी कालावधीची अट लागू राहणार नाही. उपविभागीय मुख्यालय असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी तसेच अन्य तालुक्यांमध्ये तहसीलदार यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व गटविकास अधिकारी यांना निमंत्रित करून तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रगती अभियानाची संकल्पना मांडावी. या बैठकीस विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती यांना सहभागी होण्यासाठी विशेष विनंती करण्यात यावी, अशा सूचनाही दिल्या.
जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांनी ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धेत’ सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या विभागाची उत्कृष्ट कामगिरी व नाविन्यपूर्ण उपक्रम विहित पद्धतीने ऑनलाईन सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.
*****
Sunday, November 22
ताज्या बातम्या:
- खा. रामराव वडकूते यांचे नवी दिल्लीत अल्पशा आजाराने निधन
- दामपुरी येथून ५ लाखांची बोलेरो पिकअप चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
- विशेष लोकअदालतीत 32 प्रकरणे निकाली : धनादेश अनादर प्रकरणांतून 28 लाख 96 हजार 806 रुपयांची वसुली; 21 नोव्हेंबर रोजी आयोजन
- कौसडीच्या सचिन अरुण गिरी यांना पीएच.डी. पदवी प्रदान गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा
- राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताहानिमित्त उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन
- परभणीतील वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर; जिल्हाधिकाऱ्यांकडे AIYF चे सविस्तर निवेदन!
- संत तुकाराम महाविद्यालयात उद्या हभप बाळू महाराज गिरगावकर यांचे कीर्तन; स्व. अॅड. शेषरावजी भरोसे (आबा) यांच्या 17 व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजन
- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात बसच्या चाकाखाली सापडून एकाचा मृत्यू ; दुसरा जखमी


