जिंतूर,(प्रतिनिधी) : जिंतूर शहरातील एका महाविद्यालयाच्या पाठीमागील परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून, दोघे जण फरार झाले आहेत. पोलिसांनी जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
महाविद्यालयाच्या पाठीमागील परिसरात जुगार सुरू असल्याची माहिती जिंतूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच काही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. या कारवाईत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले, तर दोघे जण फरार झाले. याप्रकरणी संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक नामदेव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुधाकर चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक इंगोले, पोलीस हवालदार नशीब पठाण, पोलीस शिपाई बाळकृष्ण कांबळे, माणिक चौधरी आणि एकनाथ सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली. जिंतूर शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. विशेषतः शैक्षणिक संस्थांच्या परिसरात अशा अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी नियमित गस्त वाढवून कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Tuesday, October 13
ताज्या बातम्या:
- आ. डॉ. राहुल पाटील यांच्या आश्वासनानंतर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन स्थगित
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माधव नगर विभागाचा 24 ऑक्टोंबर रोजी विजयादशमी उत्सव
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महानगर जिल्हाध्यक्षपदी अक्षय देशमुख यांची निवड
- राज्यात ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ राबविणार; संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाची पूर्वतयारी; चारा जतन, प्रक्रिया व उत्पादनावर भर
- दिवाळीत गड-किल्ल्यांच्या ‘दुर्गोत्सव २०२६’ मध्ये सहभागी व्हा!- दि. 5 ते 25 नोव्हेंबरदरम्यान ऑनलाइन नोंदणीची सुविधा
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६; आधार प्रमाणीकरणासाठी तिसरी यादी प्रसिद्ध; पात्र शेतकऱ्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन
- ॲग्रीव्हिजनच्या १०व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी परभणीच्या ओमकार डोके, समीक्षा सुतार आणि सिद्धी काशीकर या तिघांची निवड; राष्ट्रीय व्यासपीठावर परभणी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व
- नांदेड रेल्वे विभागाच्या तिकीट तपासणी मोहिमेत 5.25 लाखांची वसुली : दोन दिवसांत 562 प्रकरणे उघड


