परभणी,(प्रतिनिधी) : बालविद्या मंदिर हायस्कूलचे शिक्षक व समुपदेशक प्रवीण सोनवणे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शनिवारी (दि.10) येथील अक्षदा मंगल कार्यालयात कौटुंबिक सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेचा, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत दिलेल्या योगदानाचा तसेच प्रेमळ व मनमिळाऊ व्यक्तिमत्त्वाचा गौरव करण्यात आला.
परभणीतील ‘तन-मन-धन’ प्रतिष्ठानचे संस्थापक नंदुसेठ तापडिया यांच्या पुढाकाराने आणि सुभाष बाकळे, डॉ. व्ही. डी. पाटील, सूर्यकांत जेठुरे, संजय देशमुख, अशोक पाटील व संजय ठाकरे यांच्या सहकार्याने या स्नेहपूर्ण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी मंत्री सुरेशराव वरपुडकर, प्रसिद्ध विधिज्ञ अशोक सोनी, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. विवेक नावंदर आणि प्राध्यापक नलावडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी सोनवणे यांच्या शैक्षणिक कारकिर्दीचे कौतुक करताना विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता जीवनमूल्यांची शिकवण देण्यात त्यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा गौरव केला. या कौटुंबिक स्नेहमेळाव्यास परभणीतील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, डॉक्टर, वकील, शिक्षक तसेच कृषी विद्यापीठातील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला स्नेह आणि आपुलकीचे स्वरूप प्राप्त झाले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
सेवानिवृत्ती ही नोकरीतील एका पर्वाची समाप्ती असली, तरी आपल्या कार्यातून विद्यार्थ्यांच्या मनात आणि समाजात निर्माण केलेले स्थान कायम राहते, या भावनेतून सोनवणे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद, समाधान आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा सन्मान करताना माणुसकीची नाती, स्नेह आणि आपुलकी जपण्याचा आदर्श या कौटुंबिक सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून उपस्थितांसमोर आला.
Tuesday, October 13
ताज्या बातम्या:
- आ. डॉ. राहुल पाटील यांच्या आश्वासनानंतर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन स्थगित
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माधव नगर विभागाचा 24 ऑक्टोंबर रोजी विजयादशमी उत्सव
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महानगर जिल्हाध्यक्षपदी अक्षय देशमुख यांची निवड
- राज्यात ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ राबविणार; संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाची पूर्वतयारी; चारा जतन, प्रक्रिया व उत्पादनावर भर
- दिवाळीत गड-किल्ल्यांच्या ‘दुर्गोत्सव २०२६’ मध्ये सहभागी व्हा!- दि. 5 ते 25 नोव्हेंबरदरम्यान ऑनलाइन नोंदणीची सुविधा
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६; आधार प्रमाणीकरणासाठी तिसरी यादी प्रसिद्ध; पात्र शेतकऱ्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन
- ॲग्रीव्हिजनच्या १०व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी परभणीच्या ओमकार डोके, समीक्षा सुतार आणि सिद्धी काशीकर या तिघांची निवड; राष्ट्रीय व्यासपीठावर परभणी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व
- नांदेड रेल्वे विभागाच्या तिकीट तपासणी मोहिमेत 5.25 लाखांची वसुली : दोन दिवसांत 562 प्रकरणे उघड


