परभणी,(प्रतिनिधी) : श्वासनलिकेचे अत्यंत तीव्र अरुंदीकरण झाल्याने श्वास घेणे आणि बोलणे कठीण झालेल्या दोन रुग्णांवर परभणी मेडिकल कॉलेज व आर.पी. हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे मोंटगोमेरी टी-ट्यूबद्वारे श्वासनलिका स्टेंटिंगची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या उपचारांमुळे दोन्ही रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली असून, त्यांना पुन्हा दैनंदिन कामकाज आणि रोजगार सुरू करणे शक्य झाले आहे.
परभणी मेडिकल कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमेर तडवी यांनी शस्त्रक्रिया करणार्या डॉक्टरांचे अभिनंदन केले. कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. एम. डी. फैज उर रहमान यांनी ऑपरेशन थिएटरमधील किशोर नवले आणि इतर सहकारी कर्मचार्यांच्या मदतीने या दोन्ही गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या. दोन्ही रुग्ण आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून, रोजंदारीवर काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. श्वासनलिका अत्यंत अरुंद झाल्यामुळे त्यांना श्वास घेण्यास आणि बोलण्यास अडचणी येत होत्या. परिणामी, त्यांच्या दैनंदिन जीवनावर तसेच रोजगारावर मोठा परिणाम झाला होता.
शस्त्रक्रिया आणि त्यानंतरच्या उपचारांमुळे दोन्ही रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. आता ते व्यवस्थित बोलू शकत असून, दैनंदिन कामे करण्यासोबतच पुन्हा कामावर जाण्यासही सक्षम झाले आहेत. त्यामुळे त्यांना स्वतःची उपजीविका सुरू ठेवण्यास आणि कुटुंबाला आर्थिक आधार देण्यास मदत झाली आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही शस्त्रक्रिया शासकीय आरोग्य योजनेअंतर्गत करण्यात आल्या.
Tuesday, October 13
ताज्या बातम्या:
- आ. डॉ. राहुल पाटील यांच्या आश्वासनानंतर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन स्थगित
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माधव नगर विभागाचा 24 ऑक्टोंबर रोजी विजयादशमी उत्सव
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महानगर जिल्हाध्यक्षपदी अक्षय देशमुख यांची निवड
- राज्यात ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ राबविणार; संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाची पूर्वतयारी; चारा जतन, प्रक्रिया व उत्पादनावर भर
- दिवाळीत गड-किल्ल्यांच्या ‘दुर्गोत्सव २०२६’ मध्ये सहभागी व्हा!- दि. 5 ते 25 नोव्हेंबरदरम्यान ऑनलाइन नोंदणीची सुविधा
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६; आधार प्रमाणीकरणासाठी तिसरी यादी प्रसिद्ध; पात्र शेतकऱ्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन
- ॲग्रीव्हिजनच्या १०व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी परभणीच्या ओमकार डोके, समीक्षा सुतार आणि सिद्धी काशीकर या तिघांची निवड; राष्ट्रीय व्यासपीठावर परभणी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व
- नांदेड रेल्वे विभागाच्या तिकीट तपासणी मोहिमेत 5.25 लाखांची वसुली : दोन दिवसांत 562 प्रकरणे उघड


