जिंतूर,(प्रतिनिधी) : बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जिंतूर तालुक्यातील केहाळ तांडा येथील विजय प्रल्हाद चव्हाण (वय 36) यांनी मंगळवारी (दि. 13) आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विजय चव्हाण हे शेती व्यवसाय करीत होते. मुलांच्या शिक्षणाची व भविष्याची जबाबदारी असलेल्या विजय यांना बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळाल्यास मुलांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, अशी आशा होती. त्यांची मुलगी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करीत असल्याने आरक्षणाच्या प्रश्नावरून ते मागील काही महिन्यांपासून व्यथित असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मंगळवारी दुपारी शेतात गेल्यानंतर विजय यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुगाणे यांनी प्राथमिक पंचनामा केला.
चव्हाण यांच्या खिशात चिठ्ठी आढळल्याची माहिती असून, बंजारा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख त्यात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक नामदेव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुगाणे पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, चव्हाण यांच्या पश्चात पत्नी लक्ष्मीबाई, मुलगी प्रभावती (वय 19) आणि दोन मुले असा परिवार आहे.
Friday, October 16
ताज्या बातम्या:
- राज्य सरकारच्या दुष्काळ निवारण उपाययोजनांचे भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी केले स्वागत
- परभणी जिल्ह्यातील ५२ ऐतिहासिक वारसा स्थळांच्या प्रदर्शनाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या हस्ते उद्घाटन
- कलाम स्ट्रीम चॅलेंजमध्ये श्री शिवाजी अभियांत्रिकीची बाजी ४० विद्यार्थ्यांची इस्रो भेटीसाठी निवड; परभणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव
- १२ हजारांचे शिक्षण शुल्क थेट २० हजारांवर; शुल्कवाढ रद्द करण्यासाठी अभाविप आक्रमक
- टाकळी येथे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दुष्काळसदृश परिस्थितीची केली पाहणी
- पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेचे काटेकोर पालन करा; अपर विभागीय आयुक्त डॉ. प्रताप काळे
- मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर दावे व हरकती दाखल करण्यास २६ ऑक्टोबर मुदत
- शिरकळस येथे धान्य संकलन व विक्री केंद्राचे उद्घाटन उत्साहात संपन्न- महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मिळणार चालना


