जिंतूर (प्रतिनिधी) येथील ज्ञानोपासक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी तथा सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. पंढरीनाथ धोंडगे यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या युवक महोत्सवाच्या संयोजन समितीवर सदस्य म्हणून निवड झाली आहे. सदर निवड कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केली आहे.
परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या चार जिल्ह्यासांठीचा ‘आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ज्ञानतीर्थ-२०२६’ हा नांदेड येथील सायन्स काॕलेजमध्ये १६ ते १९ आॕक्टोबर २०२६ या कालावधीत संपन्न होत आहे. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाने कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली संयोजन समिती नेमली आहे. या संयोजन समितीवर प्रा. पंढरीनाथ धोंडगे यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे.
या निवडीबद्दल ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माजीमंत्री ॲड. गणेशरावजी दुधगावकर, सचिव डॉ. सौ. संध्याताई दुधगावकर, सहसचिव इंजि. समीर दुधगावकर, प्राचार्य डॉ. श्रीधर भोंबे, उपप्राचार्य डॉ. शाम गोरे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य इंजि. नारायण चौधरी, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मारोती गायकवाड, परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील, डॉ. विवेक नावंदर, डॉ. गणेश चव्हाण, डॉ . संतोष जाधव, डॉ. निवृत्ती पोपतवार आदींनी प्रा. धोंडगे यांचे अभिनंदन केले आहे.


