परभणी,(प्रतिनिधी) : शहरातील दर्गा रोड परिसरातून पाच गायी आणि एका वासरासह सुमारे 80 हजार रुपये किमतीचा गोवंश अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी 3 ऑगस्ट रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील विविध भागांतून गोवंश चोरीच्या घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी लक्ष्मी नगर परिसरातून चारचाकी वाहनातून गोवंश चोरीला गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता दर्गा रोड परिसरात पुन्हा गोवंश चोरी झाल्याने पशुपालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणी खलील अब्दुल जब्बार कुरेशी यांनी कोतवाली पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या मालकीच्या पाच गायी आणि एका वासराची 20 जुलै रोजी रात्री 8 ते 10 वाजण्याच्या सुमारास चोरी झाली. घटनेनंतर त्यांनी परभणी शहर तसेच परिसरातील गावे आणि तालुक्याच्या ठिकाणी शोध घेतला. मात्र गोवंश मिळून आला नाही. अखेर त्यांनी 3 ऑगस्ट रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, आयशर वाहनातून दाटीवाटीने पशूंची वाहतूक करणारे एक वाहन जिंतूर ते औंढा मार्गावर पोलिसांनी पकडले. ही कारवाई 3 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या वाहनामध्ये सात गोर्हे आढळून आले. पोलिसांनी वाहनासह एकूण 7 लाख 83 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार बाळकृष्ण कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहनचालक रमेश गायकवाड याच्याविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जिंतूर पोलीस करीत आहेत.
Saturday, October 3
ताज्या बातम्या:
- ५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक; चौथ्या दिवशी ३१ इच्छुकांनी घेतले ५९ नामनिर्देशन पत्रे; १० उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल
- धसाडी परिसरात 153 किलो गांजा जप्त : शेतात गांजाची बेकायदेशीर लागवड; एकास पोलिसांनी घेतले ताब्यात
- वडगाव जि. प. शाळेत विद्यार्थ्यांनी अनुभवला ध्यान-योगाचा आनंद; सेवा संकल्प अभियानांतर्गत आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश
- ऑटो एलपीजी उद्योग वाचवण्यासाठी केंद्र सरकारने ठोस धोरणात्मक पावले उचलावीत; नितीन सोळंके ची मागणी
- बाल विद्यामंदिर हायस्कूलच्या प्रवीण सोनोने यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न
- विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत ओजस्विता राहुल पाटीलचे सुवर्णयश; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र
- दुष्काळी पंचनामे वेगाने; प्रशासन अलर्ट मोडवर : परभणी जिल्ह्यात पीक परिस्थितीचा प्रशासनाकडून आढावा
- सेवा संकल्प अभियान; कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात पोषण, बालविवाह व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन


