परभणी, (प्रतिनिधी)- परभणी तालुक्यातील सर्व शहर ग्रामीण भागातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ राज्य पुरस्कृत निवृत्ती वेतन योजना या योजनेतील केंद्र पुरस्कत निवृत्ती वेतन योजनाच्या लाभार्थ्यांनी आपले हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने सादर करावे, असे आवाहन तहसीलदार संदीप राजपुरे यांनी केले आहे.
शासनाने केंद्र पुरस्कत योजने अंतर्गत लाभ घेणा-या लाभार्थ्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकीट हणजे हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन जनरेट केलेले प्रमाणपत्र या प्रक्रियेसाठी आधार आरडी फेस व Beneficiary Satyapn App हे अॅप डाउनलोड करुन आधार प्रमाणीकरणाच्या आधारे फेस ऑथेंटिकेशन करायचे आहे. हे प्रमाणपत्र थेट एनएसएपी पोर्टलवर अपेडेट होणार आहे. लाभार्थी स्वतः मोबाईलवरुन तसेच महा-ई-सेवा केंद्र, ग्राम महसूल अधिकारी किंवा तहसिल कार्यालयाच्या मदतीने हि प्रक्रिया करु शकतात. दिनांक 20 डिसेंबर 2026 पर्यंत खालील प्रमाणे प्रक्रिया करुन हयात प्रमाणपत्र काढण्यात यावे.
Google Play Store वरुन खालील दोन अॅप डाऊनलोड करा AadharFaceRd App, Beneficiary Satyapn App, Beneciary Satypan App ओपन करा, भाषा निवडा. Device Registration करा आधार क्रमांक मोबाईल क्रमांक, ई-मेल (ऐच्छीक) माहिती भरावी. ओटीपी द्वारे रजिस्टेशन पूर्ण करा. Face Authentication करा. मोबाईलचा कॅमेरा वापरुन डोळ्यांची हालचाल करुन सेल्फी घ्या. त्यानंतर Beneficiary Verification Cartificate मिळेल तरी सर्व लाभार्थ्यांनी आपल्या हयातीचे प्रमाणपत्र लवकरात लवकर Beneciary Satypan App द्वारे ऑनलाईन तयार करुन शासनाच्या योजनांचा लाभ सुरु ठेवा, असे आवाहन तहसीलदार संदीप राजपुरे यांनी केले आहे.
***


