परभणी (प्रतिनिधी) राज्यसभेचे दिवंगत खासदार रामराव वडकुते यांचे पार्थिव छञपती संभाजी नगरमार्ग आज सकाळी साडेअकरा वाजता परभणीतील कल्याण नगर येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.



