परभणी (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी महानगर शाखेच्या वतीने २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त स्टेशन रोड येथील भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुख्य पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
भारतीय संविधानाचा स्वीकार २६ नोव्हेंबर १९४९ रोजी करण्यात आला. संविधान दिनानिमित्त स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या संविधानातील मूलभूत मूल्यांचे स्मरण करण्यात आले. भारतीय लोकशाही व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्ये याविषयी यावेळी जागृती करण्यात आली.
या कार्यक्रमास भाजपा ज्येष्ठ नेत्या डॉ. मीना परतानी, भाजपा महानगर सरचिटणीस मंगल मुदगलकर, भाजपा महानगर जिल्हा उपाध्यक्ष उमेश शेळके, प्रदेश युवा मोर्चा भाजपा माजी सचिव नागसेन पुंडगे, वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज पोरवाल, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष मनीषा जाधव, महिला मोर्चा सरचिटणीस अपर्णा जोशी, भाजपा तालुकाध्यक्ष दत्तात्रय साबळे, भाजपा पदाधिकारी दीपाली वाघ, खाडे साहेब, महिला मोर्चा सरचिटणीस रेखा पाईकराव, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भक्ती शहाणे, भाजपा पदाधिकारी श्रद्धा शिंदे आदींची उपस्थिती होती.
यावेळी भाजपा पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधानाने दिलेल्या लोकशाही मूल्यांची जपणूक करून सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेचा विचार समाजात रुजविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.


