परभणी,(प्रतिनिधी) : तालुक्यातील झरी येथील एका ग्रामस्थाचा जलालपुर पाटीजवळील एका रस्ते अपघातात मृत्यू झाला तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला. मंगळवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली.
राजेश शिवाजी जाधव व प्रसाद जगाळे हे दोघे मंगळवारी रात्री टाकळी कुं. येथून मोटारसायकलद्वारे गावी निघाले होते. त्यावेळी जलालपुर पाटीजवळील कोहलीच्या पुलाजवळ रात्री साडेसात वाजेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. त्यात राजेश जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रसाद जगाडे हे गंभीर जखमी झाले. झरी येथील ग्रामस्थांना ती बाब कळाल्याबरोबर काहींनी घटनास्थळी धाव घेतली व गंभीर जखमी प्रसाद जगाडे यांना तातडीने परभणीतील जिल्हा रुग्णालय व तेथून पुढील उपचारार्थ नांदेड येथील रुग्णालयात हलविले. दरम्यान, या घटनेनंतर वाहन चालक घटनास्थळावरुन वाहनासह फरार झाला.
दरम्यान, मृत पावलेल्या जाधव यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा मोठा परिवार आहे. जाधव हे कुटूंबातील कर्ते पुरुष होते.
Wednesday, November 25
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा सीनियर जर्नलिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संतोष धारासूरकर; कार्याध्यक्षपदी दिलीप माने तर सरचिटणीसपदी प्रविण देशपांडे
- झरी येथील ग्रामस्थाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू; अन्य एक गंभीर जखमी जलालपुर पाटीजवळील घटना
- पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी ऐकून घेतल्या नागरिकांच्या तक्रारी; हिंगोलीत ‘जनसंवाद’ उपक्रमात ९ तक्रारींची नोंद; तक्रार निवारणासाठी तात्काळ सूचना
- 26 नोव्हेंबरला ठाणे येथे होणार्या संविधान रक्षा मार्चच्या नियोजनासाठी काँग्रेसची जिल्हास्तरीय बैठक
- बी 67 च्या शेतकर्यांवर पाणीवाटपात अन्याय; शेतकरी आक्रमक : 9 डिसेंबरपूर्वी चारीला पाणी सोडण्याची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा
- श्री क्षेत्र हातनूर येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य दीपोत्सव : श्री नागनाथ बारवतीर्थ परिसरात दीपप्रज्वलन
- ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरावेत; राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन
- हुंडाबंदी दिन’ साजरा करण्याचे जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे आवाहन


