परभणी,(प्रतिनिधी) : काँग्रेस पक्षाच्या वतीने ‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियानांतर्गत 26 नोव्हेंबर रोजी ठाणे येथे आयोजित करण्यात येणार्या संविधान रक्षा मार्चच्या नियोजनासाठी सावली विश्रामगृह येथे बुधवार 24 नोव्हेंबर रोजी शहर व ग्रामीण काँग्रेसची जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत मार्चच्या तयारीचा आढावा घेऊन परभणी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याबाबत सविस्तर नियोजन करण्यात आले.
या बैठकीला परभणी लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक राजेंद्र राख, जिल्हा प्रभारी माजी आमदार नामदेवराव पवार, गंगाखेड विधानसभा प्रभारी मोईनुद्दीन चौधरी, माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी, शहर जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, माजी आमदार सुरेशदादा देशमुख, सिद्धार्थराव हत्तीअंबीरे, बाळासाहेब देशमुख, मुजाहेद खान, नागसेन भेरजे, रामभाऊ घाडगे, हेमंतराव आडळकर, भगवानराव वाघमारे, गुलमीर खान, उपमहापौर गणेशराव देशमुख, विनोदराव कदम, सुनीलराव देशमुख, आशिष हारकळ, सुधीर कांबळे, अजित वरपूडकर आदींसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी दिवंगत खासदार रामराव वडकुते यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या कार्याचा आणि योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करून उपस्थितांनी आदरांजली वाहिली. त्यानंतर संविधान रक्षा मार्चच्या तयारीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी प्रत्येक तालुकाध्यक्षांना आपापल्या तालुक्यातील तयारीबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. ठाणे येथे होणार्या संविधान मार्चमध्ये जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, यासाठी तालुकानिहाय नियोजनावर चर्चा करण्यात आली.
संविधानाचे रक्षण आणि लोकशाही मूल्यांचे जतन हा या मार्चचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले. परभणी जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने ठाणे येथील मार्चमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबाजानी दुर्राणी आणि शहर जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांनी केले.
Wednesday, November 25
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा सीनियर जर्नलिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संतोष धारासूरकर; कार्याध्यक्षपदी दिलीप माने तर सरचिटणीसपदी प्रविण देशपांडे
- झरी येथील ग्रामस्थाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू; अन्य एक गंभीर जखमी जलालपुर पाटीजवळील घटना
- पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी ऐकून घेतल्या नागरिकांच्या तक्रारी; हिंगोलीत ‘जनसंवाद’ उपक्रमात ९ तक्रारींची नोंद; तक्रार निवारणासाठी तात्काळ सूचना
- 26 नोव्हेंबरला ठाणे येथे होणार्या संविधान रक्षा मार्चच्या नियोजनासाठी काँग्रेसची जिल्हास्तरीय बैठक
- बी 67 च्या शेतकर्यांवर पाणीवाटपात अन्याय; शेतकरी आक्रमक : 9 डिसेंबरपूर्वी चारीला पाणी सोडण्याची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा
- श्री क्षेत्र हातनूर येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य दीपोत्सव : श्री नागनाथ बारवतीर्थ परिसरात दीपप्रज्वलन
- ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरावेत; राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन
- हुंडाबंदी दिन’ साजरा करण्याचे जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे आवाहन


