सेलू,(प्रतिनिधी) : ऐतिहासिक व प्राचीन वारसा स्थळ म्हणून ओळखल्या जाणार्या श्री क्षेत्र हातनूर येथील श्री नागनाथ भगवान मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा व देव दिवाळीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त मंदिरात फुलांची मनमोहक सजावट करण्यात आली, तर श्री नागनाथ बारवतीर्थ येथे भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीमती प्रयागबाई साहेबराव मापरी (गंगाखेड) यांच्या वतीने या दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दीपोत्सवासाठी बालासाहेब शेळके, परमेश्वर काकडे, विठ्ठल काकडे, परमेश्वर आद्रट, रंगनाथ आहेरकर, करण आंधळे, वैभव गाडे आणि भुजंग काकडे यांनी परिश्रम घेतले. या धार्मिक सोहळ्यास गावातील महिला मंडळासह पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. दीपोत्सवामुळे श्री नागनाथ मंदिर आणि बारवतीर्थाचा संपूर्ण परिसर दीपप्रकाशाने उजळून निघाला होता. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
Wednesday, November 25
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा सीनियर जर्नलिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संतोष धारासूरकर; कार्याध्यक्षपदी दिलीप माने तर सरचिटणीसपदी प्रविण देशपांडे
- झरी येथील ग्रामस्थाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू; अन्य एक गंभीर जखमी जलालपुर पाटीजवळील घटना
- पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी ऐकून घेतल्या नागरिकांच्या तक्रारी; हिंगोलीत ‘जनसंवाद’ उपक्रमात ९ तक्रारींची नोंद; तक्रार निवारणासाठी तात्काळ सूचना
- 26 नोव्हेंबरला ठाणे येथे होणार्या संविधान रक्षा मार्चच्या नियोजनासाठी काँग्रेसची जिल्हास्तरीय बैठक
- बी 67 च्या शेतकर्यांवर पाणीवाटपात अन्याय; शेतकरी आक्रमक : 9 डिसेंबरपूर्वी चारीला पाणी सोडण्याची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा
- श्री क्षेत्र हातनूर येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य दीपोत्सव : श्री नागनाथ बारवतीर्थ परिसरात दीपप्रज्वलन
- ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरावेत; राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन
- हुंडाबंदी दिन’ साजरा करण्याचे जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे आवाहन


