परभणी,(प्रतिनिधी) : परभणी तालुक्यातील पाटबंधारे विभागाच्या पाणी वितरण व्यवस्थेत बी 67 च्या शेतकर्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत शेतकर्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बी 68 च्या चारीला वारंवार पाणी सोडले जात असताना बी 67 च्या चारीकडे मात्र दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकर्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याप्रकरणी शेतकर्यांनी परभणी पाटबंधारे विभागाच्या मुख्याधिकार्यांना निवेदन देऊन तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
शेतकर्यांच्या म्हणण्यानुसार, ऑगस्ट महिन्यातही बी 68 च्या चारीला पाणीपुरवठा करण्यात आला होता. आता पुन्हा त्याच चारीला सातत्याने पाणी सोडण्यात येत असून बी 67 च्या चारीला मात्र पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. पाणी वितरणातील या दुजाभावामुळे बी 67 अंतर्गत येणार्या गावांतील शेतकर्यांच्या रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोखर्णी, आंबेटाकळी, पोरर्वर्ड, देऊळगाव, दैठणा, माळसोन्ना, धसाडी, आंगलगाव, खरबडा, वझुर, ठोळा आदी गावांतील शेतकरी या प्रकारामुळे अडचणीत आले आहेत. पाणीवाटपात समानता राखून सर्व चार्यांना नियोजनानुसार पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
पाणीवाटपाचा पहिला टप्पा 9 डिसेंबर 2026 रोजी संपणार असल्याने त्यापूर्वी बी 67 च्या चारीला पाणी सोडणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी बी 67 चारीला पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल न घेतल्यास शेतकर्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर मोठ्या संख्येने शेतकर्यांच्या स्वाक्षर्या असून, पाटबंधारे विभागाने पाणीवाटपातील दुजाभाव दूर करून बी 67 च्या शेतकर्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर प्रताप लाड, रंगनाथ शिसोदे, अरुण चव्हाण, दिपक लाड, रामा पवार, मोतीराम पवार, अमोल लाड, नारायण लाड, दत्तात्रय लाड, परसराम कच्छवे, सुरेश चव्हाण, दत्ता लाड, सखाराम लाड, जगन लाड, विनायक जाधव, छत्रगुण लाड, बाळासाहेब लाड, नितीन लाड, मनोज चव्हाण, रामचंद्र शेळके, अमर लाड, विठ्ठल जाधव, अनंता लाड, बळीराम लाड यांच्या स्वाक्षर्या आहेत.
Wednesday, November 25
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा सीनियर जर्नलिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संतोष धारासूरकर; कार्याध्यक्षपदी दिलीप माने तर सरचिटणीसपदी प्रविण देशपांडे
- झरी येथील ग्रामस्थाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू; अन्य एक गंभीर जखमी जलालपुर पाटीजवळील घटना
- पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी ऐकून घेतल्या नागरिकांच्या तक्रारी; हिंगोलीत ‘जनसंवाद’ उपक्रमात ९ तक्रारींची नोंद; तक्रार निवारणासाठी तात्काळ सूचना
- 26 नोव्हेंबरला ठाणे येथे होणार्या संविधान रक्षा मार्चच्या नियोजनासाठी काँग्रेसची जिल्हास्तरीय बैठक
- बी 67 च्या शेतकर्यांवर पाणीवाटपात अन्याय; शेतकरी आक्रमक : 9 डिसेंबरपूर्वी चारीला पाणी सोडण्याची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा
- श्री क्षेत्र हातनूर येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य दीपोत्सव : श्री नागनाथ बारवतीर्थ परिसरात दीपप्रज्वलन
- ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरावेत; राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन
- हुंडाबंदी दिन’ साजरा करण्याचे जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे आवाहन


