परभणी,(प्रतिनिधी) : सीनियर जर्नलिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य संलग्न परभणी जिल्हा सीनियर जर्नलिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संतोष धारासूरकर, कार्याध्यक्षपदी दिलीप माने व जिल्हा सरचिटणीसपदी प्रवीण देशपांडे यांची निवड करण्यात आली.
या जिल्हा कार्यकारणीत जिल्हाध्यक्ष म्हणून धारासूरकर, जिल्हा उपाध्यक्ष म्हणून जगदीश जोगदंड, प्रमोदकुमार साळवे, शिवमल्हार वाघे, नारायण पाटील, कार्याध्यक्ष म्हणून दिलीप माने पाटील, जिल्हा सरचिटणीस म्हणून प्रवीण देशपांडे, जिल्हा सहचिटणीस म्हणून सुरेश जंपनगीरे, कोषाध्यक्ष म्हणून दत्ता लाड, कार्यालय प्रमुख म्हणून आनंद पोहनेरकर यांनी निवड करण्यात आली.
तसेच या जिल्हा कार्यकारणीत सदस्य म्हणून मल्हारिकांत देशमुख, शिवाजी वाघमारे, मदन कोल्हे, सय्यद युनूस, अनिल दाभाडकर, मोहम्मद युनूस अन्वर, राजा पुजारी (परभणी), डॉ. हरिभाऊ पाटील, हिराजी भोसले (पूर्णा), संग्राम खेडकर (पालम), गोविंद यादव, ज्ञानोबा रानगिरे, महालिंग भिसे, प्रताप ठाकूर, संभाजी वाडेमाले (गंगाखेड), राजेश्वर खेडकर (सोनपेठ), अॅड. श्रीपाद कोंत, सुनील उन्हाळे, सुधाकर गोंगे (पाथरी), के.डी. वर्मा, मोहन बारहाते (मानवत) डी.व्ही. मुळे, पुनमचंद खोना, संतोष कुलकर्णी, श्रीपाद कुलकर्णी (सेलू), राजेभाऊ नगरकर, विनोद पाचपिल्ले, निहाल अहमद (जिंतूर) यांची व मार्गदर्शक म्हणून विजय जोशी, हेमाताई रसाळ, परवेज हाशमी, संतोष बोबडे, हेमंत कौसडीकर, आसाराम लोमटे, हनुमंत चिटणीस यांची निवड करण्यात आली.


