परभणी,(प्रतिनिधी) : संत कवी दासगणू महाराज यांच्या अनुग्रहित आणि ज्येष्ठ कीर्तनकार वैकुंठवासी तुकारामबुवा आजेगावकर यांच्या धर्मपत्नी श्रीमती रमाबाई तुकारामबुवा आजेगावकर यांचे सोमवार 23 नोव्हेंबर रोजी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी वयाच्या 106 व्या वर्षी आजेगाव (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथे निधन झाले.
श्री माधवराव आजेगावकर यांच्या त्या मातोश्री, तर तरुण कीर्तनकार श्री शंकर आजेगावकर यांच्या आजी होत.
रमाबाई आजेगावकर या संत कवी दासगणू महाराज यांच्या सहवासातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व होत्या. त्यांना बालगंधर्व, भागवताचार्य डोंगरे महाराज, पूर्णवादाचार्य रामचंद्र महाराज पारनेरकर तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचाही प्रत्यक्ष सहवास लाभला होता. मराठवाड्यातील रझाकारांच्या काळातील पोलीस अॅक्शनच्या त्या प्रत्यक्ष साक्षीदार होत्या. त्यांनी संपूर्ण भारतभर अनेक धार्मिक यात्रा केल्या होत्या. दैनिक लोकसंचार परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली


