कारेगाव (प्रतिनिधी) : येथील वसंत आश्रम शाळेत संविधान दिन मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जाधव सर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती लेडे मॅडम आणि श्री इंगळे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निर्वळ सर यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या शिल्पकारांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी संविधानाचे महत्त्व व नागरिकांची कर्तव्ये यावर विचार मांडले. मान्यवरांच्या भाषणानंतर विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे भाषणात सहभाग नोंदवत आपले विचार व्यक्त केले. शेवटी अध्यक्षीय समारोप करताना जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग सहप्रमुख गजानन मुडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. राम गारकर यांनी मानले. या सोहळ्याला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंगळे सर, कच्छवे सर, काळे सर, रोडे सर, निर्वळ सर, खिराडे सर, मोतीराम कराळे सर, सोने सर, लांडे सर, जीवन शिंदे आणि श्रीमती दैवशाला गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले


