पालम (प्रतिनिधी) गंगाखेड विधानसभा मतदारसंघ निवडणूक २०२४ चा निकाल ता.२३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून गंगाखेड येथील संत जनाबाई महाविद्यालयात प्रत्यक्षात निवडणूक विभागाकडून मतमोजणी करण्यात आली.यात एकूण ३१ मतमोजणी फेरी अखेर रासपा महायुती पुरस्कृत उमेदवार विद्यमान आमदार डॉ रत्नाकर माणिकराव गुट्टे यांना एकूण १४१७५६ तर त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास अघाडी उबाठाचे अधिकृत उमेदवार विशाल विजयकुमार कदम यांना एकूण ११४२९५ मते मिळाली.या पैकी उबाठाचे विशाल कदम यांच्या पेक्षा आ. डॉ रत्नाकर गुट्टे यांनी २७४६१ मतांची आघाडी घेत दुसऱ्यांदा विजयी झालेत.
सदर निकालाची माहिती मिळताच पालम शहरासह तालुक्यासह आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील बसस्थानक चौकात फटाके फोडून विजयाचा जल्लोष साजरा केला.तर तालुक्यातील विविध गावात फटाके फोडून जल्लोष साजरा केला.यावेळी बालासाहेब रोकडे, माधवराव गायकवाड,भगवान सिरस्कर,गजानंद रोकडे, बाबासाहेब ऐंगडे,आनंद साकला,
गजानंद देशमुख, अशदुला खान पठाण,शेख गौस, विजय घोरपडे,माधन शिंदे,दतराव घोरपडे, उब्बेद पठाण,गणेश हात्तीअंबिरे,गफार खुरेशी,अजीम पठाण,सलमान खान पठाण,मोबिन खुरेशी,गुत्तेदार ईसुफ शेख विनायक पौळ, माऊली घोरपडे, सभापती गणेश धोरपडे,राहुल शिदे,चंद्रकांत गायकवाड सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


