परभणी,(प्रतिनिधी) : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी गुरमितसिंग उर्फ रिंकूसिंग रणबिरसिंग टाक या सेल्समनला येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. नायर यांनी तीन वर्षे सश्रम कारावास 10 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास पोक्सो कायद्यान्वये तर भादंवि कलम 452 प्रमाणे 1 वर्षे सश्रम कारावा, 10 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 1 महिने साध्या कारावासाची शिक्षा सूनावली आहे.
6 ऑगस्ट 2023 रोजी अल्पवयीन मुलगी घरी असतांना या सेल्समनने तीचा विनयभंग केला. तीने आरडाओरडा केल्यानंतर आई धावून आली. तेव्हा आरोपीने गालात जोरदार चापट मारली व तेथून तो फरार झाला. या प्रकरणात नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयात खटला उभा केल्यानंतर सरकारी अभियोक्ता मार्फत न्यायालयात बाजू मांडण्यात आली. तेव्हा न्यायालयाने दोन्ही बाजूने सुनावनी पूर्ण केल्यानंतर वरीलप्रमाणे निर्णय दिला.
सदर खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता जानोबा दराडे यांचे मार्गदर्शनाखाली ऍड.आनंद गिराम यांनी सरकार पक्षातफे बाजु मांडली. रविं्रसिं परदेशी , पोलीस अधी्षक परभणी व यशवंत काळे , अपर पोलीस अधीक्षक परभणी यांचे मार्गद्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी पोउपनि सुरेश चव्हाण, पोलीस अमंलदार दत्तराव खुने, प्रमोद सु्वंशी, मपोह वंदना आदोडे यांनी काम पाहिले..


