पालम (प्रतिनिधी) नुकतेच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत दिली आहे, याच मंत्रिमंडळात आपल्या नेत्याची वर्णी लागण्यासाठी दि.४ बुधवारी शहरातील एका कार्यकर्त्यांनी भाजपाचे नेते ना. देवेंद्र फडवणीस यांच्याकडे रक्ताने लिहिलेले पत्र पाठविले आहे.
राज्यातील नुकतंच विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला राज्यातील जनतेने स्पष्टपणे सत्ता देण्यात आली आहे, याच दिलेल्या सत्तेमध्ये मागील काही राबवलेल्या अनेक कल्याणकारी योजना सह ओबीसी समाजाचेही मोठे योगदान आहे. आपला या मंत्रिमंडळामध्ये समावेश होण्यासाठी अनेक इच्छुक आपापल्या पद्धतीने काम करत आहेत. यामध्ये कार्यकर्तेही मागे नसल्याचे दिसून येत आहे. होणाऱ्या मंत्रिमंडळात ओबीसीचे नेते आ. गोपीचंद पडळकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे आ. रत्नाकर गुट्टे यांना या मंत्रिमंडळात समावेश करून त्यांना मंत्रिमंडळ चांगले दर्जाचे मंत्री देण्यात यावे यासाठी शहरातील मंगेश नरहरी घोरपडे यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणीस यांच्याकडे रक्ताने लिहिलेल्या पत्राद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.


