परभणी प्रतिनिधी- परभणी बंद काळाच्या दरम्यान वृत्तपत्र कार्यालयास पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे परभणी जिल्हा पत्रकार संघाने एका निवेदनाव्दारे केली आहे.
परभणी येथे दि.११ डिसेंबर रोजी परभणी बंदचे आवाहन करण्यात आले होते. परंतू काही समाज कंटकांनी वृत्तपत्र कार्यालयासमोर येवून दमदाटी करत काही पत्रकारांना कार्यालय बंद करण्याचे सांगत धमकाविण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणाऱ्या वृत्तपत्र व पत्रकारांना कामकाज करण्यापासून रोखण्यात आले होते. अशा घटना वांरवार होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून पत्रकारांना संरक्षणाची गरज आहे. बंद काळाच्या दरम्यान वृत्तपत्र कार्यालयास पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे परभणी जिल्हा पत्रकार संघाने एका निवेदनात केली आहे.या निवेदनावर परभणी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष राजकुमार हट्टेकर ,कार्याध्यक्ष परमेश्वर दिपके, राज्य कार्यकारिणीचे सरचिटणीस सुरेश नाईकवाडे,प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मण मानोलीकर प्रसिध्दी प्रमुख मोईन खान,सुधाकर श्रीखंडे,लक्ष्मीकांत बनसोडे ,अनिल दाभाडकर आदींच्या सह्या आहेत.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


