परभणी प्रतिनिधी – परभणी शहरातील प्रभाग क्र. २ अंतर्गत बरकत नगर,सेवक नगर, मेहराज नगर आदी ठिकाणी वीज कंपनीकडून दुर्लक्ष होत असल्यामुळेच लोंबकळणाऱ्या तारा धोकादायक बनल्या आहेत.या संदर्भात वीज वितरण कंपनीला रईस दादा मित्र मंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
.या निवेदनात महावितरण मार्फत वारंवार दुर्लक्ष केले जात असल्याने झुकलेले, वाकलेले पोल किंवा खांब, लोंबकळणारे विजेचे तारा धोकादायक बनल्या आहेत. या गंभीर प्रकारामुळे जिवीतहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विजेचे तार कोसळून एखादा जनावर दगावणे किंवा खेळणारे लहान मुलांच्या जीवास धोका निर्माण होण्याची दाट भीती व्यक्त करण्यात येत असून मुद्दाम जनतेच्या जीवांशी खेळणाऱ्या आणि गाढ झोपेत असलेल्या महावितरण कंपनीस जागे करण्यासाठीच रईस दादा मित्र मंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले.या वेळी रईस दादा मित्र मंडळाचे सर्वेसर्वा रईस खान (दादा) सोबत मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.


