परभणी (प्रतिनिधी) जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने आज सोमवार 3 फेब्रुवारी रोजी कोषागार दिन निमित्त दिपप्रज्वलन अपर जिल्हाधिकारी डाॅ.प्रताप काळे व पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते पार पडले आसुन यावेळी प्रताप काळे व रविंद्रसिह परदेशी यांचा भव्य सत्कार जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने करण्यात आला.
आहे.यावेळी आनेक मान्यवरांनी कोषागार दिन निमित्त भाषने केले.तर प्रमुख अतिथी म्हणुन अपर जिल्हाधिकारी डाॅ.प्रताप काळे,पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी,मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे,मुख्य लेखा परिक्षक व मनपाचे डाॅ.श्रीरंग भुतडा,विद्यापीठाचे नियंत्रक निर्मळ,सहाय्यक संचालक डाॅ.प्रकाश दासे,जिल्हा कोषागार अधिकारी डाॅ.दत्ता भांगे,संघटक अध्यक्ष कैलास अवरगंड,कवी डाॅ.केशव खटिंग,संतोष नारायणकर आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर कोषागार अधिकारी निलकंठ पाचंगे यांनी केले आणि सुत्रसंचालन आनंता नांदेडकर यांनी केले.तर आभार निलकंठ पाचांगे यांनी मानले.यावेळी जिल्हा कोषागार कार्यालयाचे कर्मचारी वृंद मोठया संख्येने उपस्थित होते.


