गंगाखेड (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या वतीने ब्राह्मण समाजाने वेळोवेळी निवेदन व आंदोलने करून मागण्याचा पाठपुरावा केला होता परंतु शासनाच्या वतीने अद्याप पावतो प्रलंबित मागण्याची पूर्तता करण्यात आली नाही त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व ब्राह्मण समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
त्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा निधी साठी 500 कोटी रुपयांची तरतूद करून प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय सुरू करण्यात यावे प्रत्येक जिल्ह्यात परशुराम भवानी या नावाने ब्राह्मण समाजासाठी वस्तीग्रह बांधून द्यावे ब्राह्मण मुला-मुलीसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वस्तीग्रह निर्माण करावे पुरोहित बंधूंना दर महिन्याला दहा हजार मानधन देण्यात यावे ब्राह्मण समाजातील मुला-मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्यात यावे श्रीवर्धन येथील श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे स्मारकाचे नूतनीकरण करून देखभाल करण्यात यावी सीबीएससी बोर्ड यांच्या पाठ्यपुस्तकात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्यावर आधारित धडा समाविष्ट करण्यात यावा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा चिपळूण येथील भगवान परशुराम मंदिराला व विशेष धार्मिक स्थळाचा दर्जा देण्यात यावा अशा विविध मागण्या समाज बांधवांच्या वतीने करण्यात आल्या या निवेदनावर श्याम कुलकर्णी सुनील कोणार्डे राम कासांडे अतुल तुपकर अतुल देवळे नागेश कोनार्डे बाळासाहेब राखे राजू देशमुख बंडूओझा श्रीपाद कोदरीकर दीपक जोशी मनोज नाव्हेकर देवानंद जोशी धोंडोपंत राजेंद्र. कृष्णा महाजन ऍडव्होकेट स्मिता देशमुख प्रशांत देवळे नागेश केरकर आदी समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत


