परभणी (प्रतिनिधी) स्व.अॅड. शेषरावजी धोंडजी भरोसे (आबा) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ परभणी येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, संजीवनी मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने पाचव्यांदा भव्य कृषी प्रदर्शन “संजीवनी जिल्हा कृषी महोत्सवाचे” आज दि.१४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता उद्घाटन संत तुकाराम महाविद्यालय मैदान, वसमत रोड, परभणी येथे होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार असून, या उद्घाटन समारंभास, कार्यक्रमा च्या अध्यक्षा पालकमंत्री मेघना बोर्डीकर, आ. रत्नाकर गुट्टे, आ. राजेश विटेकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थित राहणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते तथा संयोजक आनंद भरोसे यांनी दिली.
कृषी संजीवनी महोत्सवात निरनिराळे ७ दालन उभारण्यात आले आहेत. हे दालन तसेच या प्रदर्शनात २००हून अधिक कृषी उत्पादनाचे स्टॉल सहभागी झाले आहेत. या मंडपामध्ये कॉन्फरन्स हॉल देखील उभारण्यात आला असून त्यामध्ये शेतकरी बांधवाकरिता शेती विषयक चर्चासत्र व परिसंवाद, जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
कृषी प्रदर्शनात आधुनिक तंत्रज्ञान, बी-बियाणे, सेंद्रीय शेती, पद्धती, गांडूळ खत निर्मिती, पशुखाद्य, ट्रॅक्टर, आधुनिक शेती अवजारे, रासायनिक खते, कृषी मार्गदर्शक पुस्तके, ठिंबक सिंचन, सोलार उत्पादने, महिला बचत गटांची उत्पादने, गृहोपयोगी वस्तू, धान्य महोत्सव असे स्टॉल्स लागणार आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य असून जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी कृषी प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन संयोजक भरोसे व संजीवनी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान या महोत्सवात दि. १४ रोजी ह.भ.प. हरीशचैतन्य महाराज पळसखेडकर यांचे कीर्तन, दि. १५ रोजी महाराष्ट्राची लोकधारा व दि. १६ रोजी सुप्रसिद्ध लावणी साम्राज्ञी हिंदवी पाटील यांचा लावणी कार्यक्रम होणार आहे, अशीही माहिती आनंद भरोसे यांनी दिली. या महोत्सवात सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

या महोत्सवामध्ये सहा दालन राहणार असून एकूण 200 स्टॉल्सची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये शेतकरी स्टॉल्स, सजीव नमुने, प्रात्यक्षिके, तसेच प्रमुख आर्कषण म्हणून नाविन्यपुर्ण पशु इ. चा समावेश असणार आहे. तसेच यामध्ये कृषि प्रदर्शने, कृषि विषयक परिसंवाद, यशस्वी शेतकरी, शाखज्ञ तंत्रज्ञ यांची व्याख्याने तसेच उत्पादक ते ग्राहक थेट विक्री ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.
शेतकरी, कृषि बचतगट, महिला बचतगट, शेतकरी उत्पादक कंपनी, सेंद्रीय शेतमाल उत्पादन तयार करणारे शेतकरी, कृषी प्रक्रिया करणारे उद्योजक, इत्यादींना या महोत्सवात 60 कृषि स्टॉल विनाशुल्क देण्यात येणार आहेत. तसेच बियाणे कंपन्या, खते कंपन्या, किटक नाशक कंपन्या, तण नियंत्रण कंपन्या, ठिबक- तुषार संच कंपन्या, प्रक्रीया करणार्या कंपन्या व इतर कृषिशी निगडीत कंपन्या यांना 100 स्टॉल्स माफक दरात देण्यात येणार आहे. यासाठी आत्मा प्रकल्प उपसंचालक अभिषेक घोडके मो.नं. 9922516716 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कृृषी अधीक्षक दौलत चव्हाण यांनी केले आहे. तसेच यामध्ये पशु प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. त्यासाठी पशुपालकांनी देखील संपर्क साधावा. शेतकरी बांधवांना फुले, फळे, तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य इत्यादीचे जीवंत नमुन प्रदर्शनात सादर करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. तसेच सहभागी शेतकरी, पशुपालक यांच्यामधून पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे.
कृषि विषयक विकसीत तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकर्यांपर्यंत पोहचविणे, शेतकरी – शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार शेतकरी विपणन साखळी सक्षमीकरण. समुह/गट संघटीत करुन स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे, शेतकर्यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळावा, ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा याकरिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसीत करणे, कृषि विषयक परिसंवाद/व्याख्याने यांचे माध्यमातून विचारांच्या देवाणघेवाणीव्दारे शेतकर्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, विक्रेता खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजाराभिमुख कृषि उत्पादनास आणि विपणनास चालना देणे हे या प्रदर्शनाचे उद्देश आहेत, असे आयोजकांनी अशी माहिती संजीवनी मित्रमंडळाचे अध्यक्ष आनंद भरोसे व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दौलत चव्हाण यांनी दिली.


