निरपराध तरुणाना बेदम मारहाण करणाऱ्या संबधित पोलिसांवर कारवाई व निरपराध तरुणावरील दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी
परभणी (प्रतिनिधी) – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळील संविधान शिल्पाची तोडफोड केल्या प्रकरणी निषेध आंदोलन करण्यात आले.परंतु पोलिसांनी कोंबींग ऑपरेशन राबवून अनेक निरपराध भीमसैनिक तरुण आंबेडकरी कार्यकर्ते महिलाना अमानुष व बेदम मारहाण केली त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. या निरपराध तरुणाना मारहाण करण्याऱ्या पोलीसांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी.मारहाणीत जखमी झालेल्या भीमसैनिक तरुणांना शासनाने आर्थिक मदत करावी. त्यांच्यावरील दाखल गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत याबाबत जिल्हाधिकारी यांच्या दालनात गुरुवारी सायंकाळी आंबेडकरी संघटना पक्षाचे पदाधिकारी तज्ञ वकील मंडळी अन्यायग्रस्त तरुणाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या समन्वयाने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या समवेत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा वकील संघाचे मा अध्यक्ष ॲड रवि गायकवाड , पिआरपीचे नेते गौतम मुंडे सर ,ॲड. एन.व्ही. पिंपळगावर, उपस्थित होते. या बैठकीत अन्यायग्रस्त तरुणांनी कोंबिग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी रस्त्यावरून अटक केली व पोलीस ठाण्यात डांबून आमच्यासह तरुण मुली – महीलांना अमानुषपणे बेदम मारहाण केली वच्छलाबाई मानवते या महिलेस बेदम मारहाण केली तरुणाचे नुकसान केले अशी सर्व हकीकत , अमरदिप सोनकांबळे , जोंधळे , गोरे, फुनसे यांनी सादर केली.
या मारहाणीत अनेक तरुण युवक पोलिसांच्या जखमी झाले असून संबधित दोषी पो. अधिकारी कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करून योग्य कारवाई झाली पाहिजे मारहाणीत गोरगरीब जखमी झालेल्या तरुणांना शासनाने आर्थिक मदत द्यावी त्यांच्यावरील दाखल गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत असे डॉ. सिद्धार्थभाऊ हत्तीअंबिरे यांनी जिल्हाधिकारी पोलीस अधिक्षक यांच्याशी चर्चा करताना सांगितले. वकील संघटनांनी नुकतेच केंद्रीय आयोगाचे मा.नायमुर्ती आचलिया यांनी परभणीत भेट दिली परंतु अन्यायग्रस्त तरुणाच्या तक्रारी पोलीस प्रशासनाने अद्याप दाखल करून घेतल्या नाहीत हि बाब पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. दरम्यान या बाबत योग्य दोषीवर योग्य ती कारवाई होणार असून कुणाचीही गय केली जाणार नाही असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.
या बैठकीस मा.मनपा सदस्य आकाश लहाने, संदीप हिवाळे , मिलिंद घुसळे, राहुल साळवे, अमित काळे, मिलिंद खिल्लारे, रणजित मकरंद, उत्तमअण्णा गायकवाड, बुद्धभूषण हत्तीअंबीरे, संजय बगाटे, गौतम भराडे आदींची उपस्थिती होती.


