परभणी (प्रतिनिधी) महिलांना बसमध्ये 50 टक्के सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास दिला खरा, परंतु बस उपलब्ध नसतील तर या सवलतीचा उपयोग काय असा प्रश्न करत आपण परभणी विभागासाठी 500 बसची मागणी केली होती परंतु केवळ 10 बस देण्यात आल्या आहेत आधीच दुरुस्तीच्या नावाखाली परभणी विभागातून 100 बस कमी केल्या आहेत, किमान त्या तरी पुन्हा द्या अशी मागणी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी केली आहे.
आ.डॉ.पाटील यांच्या प्रयत्नातून तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या माध्यमातून परभणीला अद्यावत बसपोर्ट मिळाले, या बसपोर्टचे काम 95 टक्के पूर्णत्वाला गेले असून बस स्थानक सुरू झाले आहे, उर्वरित कामासंदर्भात आ. पाटील यांनी शनिवारी पाहणी करून आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते आ. पाटील यांनी संपूर्ण बस स्थानकाची फिरून पाहणी केली बस स्थानकाच्या पहिल्या मजल्यावर लवकरच मराठी चित्रपटगृह सुरू करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार असून
बसपोर्ट मधील उर्वरित कामासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या,परिसराची स्वच्छता राखावी, महामार्गाला जोडणारा राहिलेला सिमेंट रस्ता पूर्ण करावा, स्वच्छतागृह चांगल्या प्रकारे स्वच्छ ठेवावे, सुरक्षेच्या उपायोजना कराव्यात अशा सूचना यावेळी आ.पाटील यांनी दिल्या.
यावेळी बोलताना आ. पाटील म्हणाले शासनाने प्रवाशांसाठी विविध सवलतीच्या योजना जाहीर केल्या खऱ्या परंतु बसेसची संख्या कमी झाली,परभणी विभागात मागील वर्षात 100 बस कमी झाल्या आहेत,त्यामुळे सवलतीचा काय उपयोग असा प्रश्न केला. आपण शासनाकडे 500 बस उपलब्ध करून द्या अशी मागणी केली होती परंतु त्यात केवळ दहा बस परभणी साठी देण्यात आले आहेत हा एक प्रकारे अन्याय आहे,किमान प्रवाशांची वाढती संख्या पाहता कमी केलेल्या 100 बस पुन्हा उपलब्ध करून द्या अशी मागणी यावेळी शासनाकडे केली त्यासोबतच या भागातून वाहणाऱ्या डिग्गी नाल्याचे खोलीकरण तसेच शहरातील रखडलेले विकासाचे प्रकल्प मार्गी लागावे यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार पाटील म्हणाले.
यावेळी सह संपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, युवासेना जिल्हाप्रमुख अर्जुन सामाले उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे माजी शहर प्रमुख अनिल डहाळे आगार व्यवस्थापक काळम पाटील विभागीय भांडार अधिकारी संदीप मुंडे सोपान दादा अवचार अरविंद देशमुख रवी पतंगे नवनीत पाचपोर संभानाथ काळे वाहतूक अधिकारी साळुंखे कनिष्ठ अभियंता शेख वसीम अजित यादव रामराव डोंगरे स्वप्नील भारती केदार दुधारे हरमोहन सिंग टाक असलम शेख अजय चव्हाण बंडू नाना बिडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


