परभणी (प्रतिनिधी) हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात कृषी विभाग, महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद यांच्या वतीने कृषी दिन कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर, रश्मी खांडेकर, मार्गदर्शक म्हणून प्रा. गजानन गडदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण, तालुका कृषी अधिकारी नित्यानंद काळे, गाढवे सर, दीपा बापट, मेघा देशमुख आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या दरम्यान परभणी जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्वाती घोडके यांनी केले तर आभार कृषी विकास अधिकारी दीपक सामाले यांनी मानले. यावेळी कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी, व जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर


